
अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटीयार व झेडपीच्या सीईओ तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजीता महापात्रा यांनी आठही विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी तीन या प्रमाणे २४ मॉडेल मतदार केंद्रे (पोलिंग स्टेशन) स्थापन केली आहेत. या मॉडेल पोलिंग स्टेशनमध्ये युवा (युथ), महिला (पिंक), दिव्यांग (पीडब्ल्यूडी) आदी मतदारांसाठी राहणार आहे.
दिव्यांग मतदान केंद्रे धामणगांव रेल्वे मतदार संघातील न. प. प्राथमिक हायस्कूल चांदुर रेल्वे, बडनेरा, तखमल विद्यालय साईनगर, अमरावतीत, जि.प. माजी शासकीय माध्यमिक मुलींची शाळा चपराशीपुरा, तिवसा जि. प. मुलांची शाळा तिवसा, जु. मो. लठ्ठा, न. प. प्राथमिक मराठी कन्या शाळा बनोसा दर्यापूर, मेळघाट जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा तलई कॅम्प धारणी, अचलपूर श्रीजगदंबा महाविद्यालय अचलपूर आणि मोर्शीत शिवाजी उच्च माध्यमिक शाळा
महिला पिंक मतदान केंद्रे अशी धामणगांव रेल्वे : जि.प. हायस्कूल चांदूर रे. बडनेरा : रामकृष्ण बी.एड. महाविद्यालय, संजय गांधीनगर नं.२ अमरावती: भारतीय महाविद्यालय राजापेठ
तिवसा: जि. प. मराठी कन्या शाळा दर्यापूर: वा. का. धर्माधिकारी नगर परिषद प्राथमिक शाळा बसस्थानकाजवळ दर्यापूर मेळघाट जिल्हा परिषद माध्यमिक उर्दू शाळा धारणी
अचलपूर : श्री जगदंबा महाविद्यालय अचलपूर मोर्शी शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







