सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; सायबरकडून विनयभंगाचा एफआयआर !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर क्रिया प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. त्यावरील आक्षेपार्ह व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर सायबर पोलिसांचे सूक्ष्म लक्ष असून, आचारसंहिता कालावधीत एका आक्षेपार्ह सोशल पोस्टच्या अनुषंगाने एका महिलेच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी एका यूजरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, तर आतापर्यंत २१ सोशल मीडिया यूजर्सना पोलिस आयुक्त कार्यालयात बोलावून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यांना तंबी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्यात सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. त्या माध्यमातून अमरावती शहरामध्ये घडणाऱ्या घटना व त्याअनुषंगाने सोशल मीडियावर घडणाऱ्या घडामोडींवर २४ बाय ७ लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, मतदानासंदर्भात कोणत्याही प्रकारचे भ्रामक संदेश पोस्ट फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करू नये. शक्य असल्यास व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिननी व्हॉट्सअॅप ग्रुपची सेटिंग ‘ओन्ली अॅडमिन कॅन सेंड मेसेज’ अशी करावी, जेणेकरून ग्रुपमध्ये कोणताही सदस्य आक्षेपार्ह पोस्ट शेअर करू शकणार नाही आणि त्याची जबाबदारी ग्रुप अॅडमिनवर येणार नाही, असे आवाहन सायबर पोलिसांनी केली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013584
error: Content is protected !!