मेलघाट में फिरसे पटेल नतीजा साफ है मैं ही जितूंगा… राजकुमार पटेल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

धारणी : प्रतिनिधी मेळघाट मतदार संघातील आमदार निवडीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार केवलराम काळे, कॉग्रेस उमेदवार हेमंत चिमोटे, प्रहार पक्षाचे उमेदवार राजकुमार पटेल हे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात होते. काल झालेल्या मतदानानंतर थेट राजकुमार पटेल यांना निकाल काय असेल याबाबत चर्चा केली असता मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल म्हणाले कि मेलघाट में फिरसे पटेल ही विधायक रहेगा. नतिजा साफ है मैं ही जितूंगा. यावेळी पटेल अत्यंत आत्मविश्वसाने माझाच विजय होणार, जनता माझ्या सोबत राहली आहे. कारण पांच वर्षात थेट जनतेच्या संपर्कात मी असतो, मला भेटण्यासाठी कुठल्या मध्यस्थाची गरज नसते. थेट लोक मला भेटतात मी त्यांच्या समस्या निकाली काढतो. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो म्हणून मला मतदाता निवडून देतील असा मला आत्मविश्वास आहे. काल निवडणूक झाली आजपासुन मी जनता दरबार लावून नागरीकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी कामाला लागलो आहे असे पटेल म्हणाले. मेळघाट मतदार संघात ३०२०२९ मतदारापैकी ११४५२३ पुरुषांनी तर १०६३८६ महिलांनी, ४ इतर असे एकुण मतदानाचा २२०९१३ मतदारांनी हक्क बजावीत जिल्हयात सर्वाधिक ७३.१४ टक्के मतदान झाले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013582
error: Content is protected !!