निवडणुकीदरम्यान सातपट रोकड जप्त ७०६ कोटींचा ऐवज पकडला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

मुंबई : प्रतिनिधी मतदारांना आमिष देण्यासाठी रोकड, महा, सोने-चांदीने या वेळी महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला. रोख रकमेसह एकूण ७०६ कोटी ९८ लाखांचा ऐवज निवडणूक आयोगाने जप्त केला. मागील वेळी हा आकडा फक्त १०३.६१ कोटींपर्यंतचा होता. म्हणजेच २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत ७ पटीने अधिकचे आमिष मतदारांना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो निवडणूक आयोगाने हाणून पाडला आहे.

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये थेट लढत झाली होती. पण २१ जून २०२२ दरम्यान शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी पक्षही फुटला. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. त्यामुळे यंदा २० नोव्हेंबरपर्यंत पैशांचा महापूर पाहण्यास मिळाला. १८३. ४८ कोटींची राज्यात निव्वळ रोकड जप्त केली आहे. ९३.१३ कोटी रुपये किमतीची दारू, बिअर, रम हस्तगत केली.मडी ड्रग्ज, कोकेन निवडणूक कर्मचाऱ्यांनी जप्त केले. सर्व प्रकारच्या ड्रग्जची किंमत ७२.१४ कोटी आहे. सोने, चांदी आदी मौल्यवान धातू पकडण्याचाही या वेळी उच्चांक आहे. मागील वेळी फक्त ४०.३५ कोटींचे मौल्यवान धातू पकडले होते. इतर प्रकारच्या आमिषांसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूही पकडल्यात. त्याची किंमत ८०.९४ कोटी आहे. असे राज्यात एकूण ७०६.९८ कोटींची रोकड, मद्य आणि ड्रग्ज जप्त केले आहे. सोलापूर ते सांगोला रोडवर १९ कोटींची सर्वाधिक रोकड जप्त केली होती. त्याखालोखाल पालघरच्या वाडा पोलिस ठाणेअंतर्गत ३.७० कोटी रुपये पकडले होते.

 

महाराष्ट्रात जप्त करण्यात आली ३०५२ शस्त्रात्रे राज्यभरात ७८ हजार २६७शस्त्रे परवान्यासह दिलेली आहेत. त्यापैकी पोलिसांनी ५६६०४ शस्त्रे आचारसंहितेच्या काळात जमा करून घेतली आहेत. मात्र २३५ शस्त्रे परवान्यासह जप्त केली आहेत. परवाने नसताना शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांकडून २२०६ शस्त्रे कायमची जप्त केली आहेत. परवाने रद्द करून ६११ शस्त्रे कर्मचाऱ्यांनी जप्त केली आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013582
error: Content is protected !!