धारणी उपजिल्हा रुग्णालयात साकारली बहुप्रतीक्षित रक्तपेढी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

धारणी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी स्थापित करण्यात आली आहे. या रक्तपेढीत जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून या चळवळीत सहभागी व्हावे, यासाठी रक्तसंग्रहण हा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना रक्ताची व्यवस्था करण्यात येत आहे. मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात अनेक वर्षांपासून रक्त बँकेची आवश्यकता होती. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरवठा करण्यात आला.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. दयाराम जावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त केंद्र व रक्तघटक विलगीकरण केंद्र येथे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अमित क्षार आणि डॉ. सुभाष जांबेकर यांच्या नेतृत्वात आकाश वाघमारे, योगेश पानझडे, अविनाश जाधव कामकाज हाताळत आहेत.

धारणी तालुक्यात सिकलसेलचे प्रमाण अधिक आहे. या रुग्णांसह रुग्णालयात दाखल गर्भवती व विविध आजारांच्या महिला रुग्णांना प्रसूतीदरम्यान रक्ताची आवश्यकता सतत पडत राहते. अमरावतीच नव्हे, तर अचलपूरचे अंतरदेखील धारणी येथून आणीबाणीच्या वेळी रक्त पोहोचण्यास बराच वेळ लागतो. हे जाणून घेऊन धारणी येथील रक्तपेढीत रक्ताची कमतरता होऊ नये म्हणून लोकांना डॉ. दयाराम जावरकर यांच्याकडून जाहीररीत्या आवाहन करून रक्तदानाचे निमंत्रण देण्यात येत आहे.

लोकांनीसुद्धा याला प्रतिसाद दिला आहे. ‘महान ट्रस्ट’चे डॉ. शुभम, तसेच साथी केंद्राचे धारणी तालुका समन्वयक अर्जुन पवार यांनी अधिनस्थ कर्मचारी राकेश मावस्कर, नरेंद्र सावरकर, अनिल पटेल, कैलास दारशिंबे, अरविंद दहिकर, श्यामलाल जावरकर आदींनी रक्तदान केले आणि प्रत्येकाने आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करावे, असे आवाहन याप्रसंगी केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013582
error: Content is protected !!