
अमरावती : जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रातील १ हजार ६५६ मतदान केंद्रांवर जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी त्यांच्या कार्यालयातून नियंत्रण ठेवण्यात आला. विधानसभा निवडणुकीत यावर्षी पहिल्यांदाच ‘वेब कास्टिंग’ करण्यात आले. त्यासाठी आठही मतदारसंघातील निम्म्याहून अधिक मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यात आले होते.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात २ हजार ७०८ मतदान केंद्र आहेत. यापैकी १ हजार ६५६ मतदान म्हणजेच ६१.१५ टक्के मतदान केंद्र मतदान केंद्र जिल्हाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातून नियंत्रित केली. कोणत्या केंद्रावर किती गर्दी आहे. कोणत्या केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड झाला. कोठे काही वादावादी झाली का किंवा एखाद्या केंद्रावर कुणीच मतदानाला आले नाही का, येथील कर्मचारी योग्यपणे कर्तव्य निर्वहन करताहेत की नाही, आदी बाबी त्यांना या ठिकाणाहून दिसत होत्या. थोडक्यात अडचणीच्या ठिकाणी यंत्रणेला तत्काळ पोहोचवणे त्यांना या ठिकाणाहून शक्य झाले. जिल्हाधिकारी कार्यातील महसूल भवनात वेब कॉस्टिंगची व्यवस्था केली होती. प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र स्क्रीन होती आणि प्रत्येक स्क्रीनवर एकाचवेळी १६ मतदान केंद्रांची स्थिती बघता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, अधीक्षक नीलेश कटके व त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांनी या कक्षाचे कामकाज सांभाळले. मतदान सुरू झाल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत वेब कास्टिंग सुरूच होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







