अखेर सानपाड्यातील ओपन जिमची दुरुस्ती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

नवी मुंबई: सानपाडा येथील सायन-पनवेल महामार्गावर उभारलेल्या ओपन जिममधील साहित्याची अखेर दुरुस्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी येथील साहित्याची तोडफोड झाल्यामुळे नागरिक नाराज होते. याबाबत ‘z24news’ने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिका प्रशासनाने तत्काळ साहित्याची दुरुस्ती केली आहे.

नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून सर्वच विभागात उद्याने विकसित करण्यात आली असून, शहरातील नागरिकांचे आकर्षण वाढावे यासाठी उद्यानात जॉगिंग ट्रॅक, हिरवळ, खेळणी, ओपन जिम, आसन व्यवस्था आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे उद्यानात ज्येष्ठ नागरिक, तरुणांसह बच्चे कंपनीची गर्दी असते. शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी रस्त्याच्या दुभाजकांमधील मोकळी जागा, ट्रिबेल्स, चौक आदी ठिकाणीदेखील हिरवळ निर्माण केली आहे.

उपाययोजना करा’

उड्डाणपुलाखाली वास्तव्य करणाऱ्या गर्दुल्ले आणि मद्यपींनी या साहित्याची मोडतोड केली होती. या साहित्याचे संरक्षण तसेच दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिका प्रशासनाने मोडतोड झालेले साहित्य दुरुस्त केले आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, साहित्याच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013579
error: Content is protected !!