
शिवकुमार गुप्ता नवी मुंबई प्रतिनिधी

नवी मुंबई ऐरोली, बेलापूर, पनवेल व उरण मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांनी विजय मिळविला असून, भाजपाने गड राखण्यात यश मिळविले आहे. बेलापूरमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये मंदा म्हात्रे यांनी विजय मिळविला असून, विजयाची हॅट् ट्रिक केली आहे. विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
नवी मुंबई, पनवेल उरण परिसरामधील चारही मतदारसंघांतील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ऐरोली व बेलापूरमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती. पनवेल व उरणमध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली होती. यामुळे कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. चारही मतदारसंघांमध्ये भाजपाने बाजी मारली असून, भाजपाच्या कार्यकत्यांनी विजयाचा जल्लोष केला आहे. ऐरोलीत गणेश नाईक यांनी तब्बल ९१,८८० मतांनी विजय मिळविला आहे. उद्धवसेनेचे एम. के. मढवी व अपक्ष विजय चौगुले यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. बेलापूरमध्ये अखेरपर्यंत झालेल्या चुरशीच्या लढाईमध्ये मंदा म्हात्रे यांनी ३७७ मतांनी विजय मिळविला आहे. सर्वात उशिरा या मतदारसंघाचा निकाल जाहीर केला.
पनवेल व उरणमध्ये महाविकास आघाडीमध्ये झालेल्या बिघाडीचा फायदा भाजपच्या उमेदवारांना बसला असून, त्यांचा विजय झाला आहे.
मतमोजणी अन् जल्लोष
• ऐरोली मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीपासून भाजपने आघाडी घेण्यास सुरुवात केली. यामुळे कार्यकत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली होती.
बेलापूर मतदारसंघामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक चुरशीची झाल्यामुळे कार्यकर्तेही तणावामध्ये होते.
विजय घोषित केल्यानंतर कार्यकत्यांनी विजयी जल्लोष साजरा केला.
ऐरोलीमध्ये विजयानंतर नाईक समर्थकांनी जल्लोष
केला; पण बेलापूरमध्ये संदीप नाईक यांच्या पराभवामुळे ‘गड आला पण सिंह गेला अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







