माझा संसार मोडला, पत्नीला सोपवा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

दर्यापूर : तालुक्यातील कळाशी येथे मद्यधुंद अवस्थेत घरात प्रवेश केलेल्या जावयाने सासूला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली.याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दर्यापूर पोलिसात ४९ वर्षीय महिलेने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, जावई चंद्रमणी अरुण गवई (रा. संजय गांधीनगर, अमरावती), संजय किसन जामनिक (रा. कळाशी) व आशिष वाकपांजर (रा. थिलोरी) या तिघांनी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ५ च्या सुमारास घरात प्रवेश केला. त्यावेळी ती महिला नातवाला चहा पाजत होती. चंद्रमणीसह सर्व जण मद्यधुंद स्थितीत होते. आठ महिन्यांपासून तुमची मुलगी माहेरी आहे, तुम्ही माझा संसार मोडला. मुलाला भेटू देत नाही, असे म्हणत चंद्रमणीने शिवीगाळ केली. त्यावेळी संजयने कपातील चहा महिलेच्या अंगावर ओतला. यानंतर चंद्रमणीने थापडबुक्क्यांनी मारहाण केली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013579
error: Content is protected !!