पुरवठादार झाले उदार; आदिवासी विद्यार्थ्यांना ३६ रुपयांमध्ये जेवण देणार?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : आदिवासी विकास विभाग म्हटले की अनियमिता, गैरप्रकार ही बाब पाचवीलाच पुजले आहे. मात्र धारणी एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालय अधिनस्थ नागरवाडी येथे ९, १० व ११ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या क्रीडा स्पर्धेत आदिवासी विद्यार्थी खेळाडूंना ३६ रुपयांमध्ये एकवेळचे जेवण दिले जाणार आहे. त्याअनुषंगाने ई-निविदा मंजूरदेखील झाल्या. जेवण आणि साहित्याचा दर्जा हाताळण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर आहे.

नागरवाडी येथील आश्रमशाळेत होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत साधारणतः दोन हजार खेळाडू विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यांच्यासमवेत एक ते दीड हजार कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेच्या अनुषंगाने मुले मुलींसाठी जेवण, नाष्टा, चहा यासह टी-शर्ट, गेमपँट, मोजे, बूट, मुलींसाठी स्लॅक्स आदी साहित्याचा पुरवठा करण्यासाठी २४ ऑक्टोबर २०२४ रोजी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, आदिवासी विद्यार्थी खेळाडूंना एकवेळचे जेवण केवळ ३६ रुपयात देण्याची तयारी धारणी येथील एका पुरवठादाराने दर्शवली असल्याने त्याला हे कंत्राट सोपविण्यात आले. दरम्यान, महागाईच्या काळात ३६ रुपयात जेवणामध्ये नेमके काय देणार, याविषयी आदिवासी विकास विभागाच्या धारणी पीओंनी लिखित स्वरूपात काही बाबी अगोदरच नियमात बांधून घेतल्या आहेत. त्यामुळे जेवण, नाष्ट्यात कोणतीही कुचराई खपवून घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका धारणीच्या प्रकल्प अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर यांनी ‘z24news’शी बोलताना स्पष्ट केली आहे.

९, १० व ११ डिसेंबर रोजी नागरवाडी येथे होऊ घातलेल्या क्रीडा स्पर्धेत जेवण, नाष्टा आणि साहित्याचा दर्जा नसल्यास पुरवठादाराविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल. किंबहुना या स्पर्धेदरम्यान काही उणिवा जाणवल्यास बाजारपेठेचे दर पर्याय शोधले जाईल.

३६ रुपयांच्या जेवणात हा मेन्यू

• स्पर्धेचा आदल्या दिवशी साधे तूरडाळ वरण, बटाटे-वांग्याची

भाजी, भात, चपाती, सलाद व गुलाबजामून •

स्पर्धेचा पहिला दिवस (सकाळी) दालफ्राय, जिरा राईस,काबुली चणा भाजी, चपाती, जिलेबी, सलाद (सायंकाळी) : मूगडाळीचे वरण, साधा भात, पालकभाजी,चपाती, बुंदी, सलाद

• स्पर्धेचा दुसरा दिवस : (सकाळी) कोहळ्याची भाजी, साधे तूर डाळ वरण, साधा भात, चपाती, बेसनवडी, सलाद (सायंकाळी) : पुरी, बटाट्याची रस्सेदार भाजी, जिरा भात, सलाद, जिलेबी

• स्पर्धेचा तिसरा दिवस : (सकाळी) अंडा करी, डाळ तडका, चपाती, पनीर मसाला, मोतीचूर लाडू, जिरा राईस, पापड, सलाद सायंकाळी): डाळ पालक, चपाती, भात, बालुशाही, सलाद

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013577
error: Content is protected !!