आ. उमेश यावलकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

वरूड : विदर्भातील माळी समाज आणि सकल ओबीसी समाजाने एकत्र येत मोर्शी मतदारसंघाचे आमदार उमेश ऊर्फ चंदू यावलकर आत्माराम यांना महाराष्ट्रच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याची मागणी माळी महासंघ, माळी समाज कल्याण महासंघ व क्रांतिज्योती ब्रिगेडने केली आहे. माळी समाज विदर्भात सुमारे १२ टक्के आहे. मात्र, विनायकराव कोरडे यांच्यानंतर गेल्या २० वर्षांपासून माळी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले नाही. मोर्शी मतदारसंघात माळी समाजाचे ५६ हजार मतदार आहे. ४६ वर्षांनंतर महादेवराव आंडे यांच्यानंतर माळी समाजातील उमेदवाराला आमदारकी मिळाली. उमेश यावलकर यांना ६६ हजार मताधिक्य मिळाले. हे त्यांच्या सक्षम नेतृत्वाची ग्वाही देणारे आहे. अखेरच्या दिवशी उमेदवारी मिळूनही त्यांनी विजय मिळविला. या विजयामध्ये ओबीसी समाजबांधवांचा मोलाचा सहभाग आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013577
error: Content is protected !!