बापाची माया; मुलासाठी केली किडनी दान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या आपल्या ३३ वर्षीय मुलावर माया दाखवत ५९ वर्षीय बापाने आपली किडनी दान केली आहे. शुक्रवारी विभागीय संदर्भसेवा रुग्णालय सुपरस्पेशालिटी येथे ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. रुग्णालयातील ही ४६वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी परवेज सलीम खान (३३) हा मागील दीड वर्षापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यावर डायलिसिस उपचार सुरू होते. दीर्घकाळाच्या डायलिसिस उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. आपल्या मुलाचा होणारा त्रास लक्षात घेता वडील सलीम खान नूर खान (५९) यांनी मुलाला किडनी देण्याचा निर्णय घेतला. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013577
error: Content is protected !!