शहराचा दिमाख वाढला, रस्त्यावर दीड कोटींची मर्सिडीज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : जिल्ह्यात गत सहा महिन्यांत काही महागडी इम्पोर्टेड वाहने जिल्ह्यात दाखल झाली आहेत. त्यात दीड कोटींच्या मर्सिडीज बेंझ आणि २० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या ६२ वाहनांच्या नोंदी आहे. ११८ कोटींचे वाहने जिल्ह्यात दिमाखात मिरवत आहेत.दुचाकी आणि चारचाकी वाहन अलीकडे अनेकांची मूलभूत गरज बनले आहे. या वाहनाच्या माध्यमातून एका ठिकाणावरून दुसरीकडे प्रवास केला जातो. वाहन एकच वेळस घेतले जाते. यामुळेच खरेदी होणारे वाहन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असावे, अशी धारणा आहे. याशिवाय वाहन खरेदीसाठी सुलभ कर्जही उपलब्ध होते. यामुळे ग्राहकांकडून महागडी वाहने घेतली जातात. यातून बीएमडब्लूसारखे महागडे वाहन शहरात आले आहे. आधुनिक वाहनांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल राहिला आहे.

जिल्ह्यातील धनिकांकडे महागड्या कार उद्योजक, शिक्षक, नोकरदार, डॉक्टर, वकील आणि वर्ग १ च्या कर्मचाऱ्यांकडे महागड्या कार आहेत. घरापुढे महागडी कार उभी असणे हे प्रत्येकाचे स्वप्न झाले आहे. काहींनी तर स्पर्धेतूनही कार खरेदी केल्यात.

अलीकडे महागड्या गाडीसाठी ग्राहकांची मागणी वाढली आहे. बाजारात पाच लाखांपर्यंतची टू व्हीलर उपलब्ध आहे. बुलेटसह अन्य वाहनांना मोठी पसंती असल्याचे नोंदणीवरून लक्षात येते.

– उर्मिला पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013577
error: Content is protected !!