परतवाडा प्रतिनिधी परतवाडा शहरातील छोटाबाजार निवासी पत्रकार नितेश किल्लेदार यांच्यावर कांडली निवासी महिलेच्या तक्रारीवरुन परतवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेने तक्रारीत नमुद केले की ती लग्न व धामिक कार्यक्रमात आचारीचे काम करते. नितेश किल्लेदार यांने २४ नोव्हेंबर रोजी स्वयंपाकाचे काम करणार काय असे विचारत तुम्हाला दोन तीन कामे मिळवून देतो असे म्हणत मोबाईलवर संवाद साधला. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वा. सुमारास कॉल करत वाईट हेतुने विचारना केल्याने तक्रार दार महिला घाबरली व तिने फोन बंद केला. अशी तक्रार त्या महिलेने २९ नोव्हेंबर रोजी परतवाडा पोलिस स्टेशन येथे दाखल केल्याने भारतीय न्याय संहिता कलम ७९ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांचा अपमान करणे, अश्विल शब्द हाव भावाचे कृत्य करण्याचा या कलामांमध्ये समावेश आहे. सोशल मिडियावर नितेश किल्लेदार यांना मारहाण केल्याचा चित्रफित व्हायरल झाली असुन त्या चित्रफीतीत किल्लेदार त्या महिलेस माफी मागत असल्याचे दिसुन येते. याबाबत नितेश किल्लेदार म्हणाले कि मला जाणीवपूर्वक फसविण्यासाठी मारहाण करत खोटी तक्रार दिली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







