
अमरावती : प्रतिकूल परिस्थितीत फळपिकांना संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील ३३९२ शेतकऱ्यांनी २.८४ कोटींचा हप्ता भरून फळपीक विम्यात सहभाग नोंदविला आहे. याद्वारे ३४०१ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे. योजनेत सहभाग घेण्याची ३० नोव्हेंबर ही डेडलाइन होती.
संत्रा, मोसंबी, केळी व पपई फळपिकाला अवेळी/जास्त पाऊस, कमी/जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट, जास्त पाऊस व आर्द्रता, दैनंदिन कमी तापमान या हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. यामध्ये १४१ कर्जदार व ३२५१ बिगर कर्जदार, अशा एकूण ३३९२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी २,८७,३९,३५७ रुपयांचा प्रिमियम भरला आहे. याशिवाय ६.८८ कोटी राज्य शासन व ४.१४ कोटींचा हप्ता केंद्र शासन भरणा करणार आहे.गतवर्षीचा फळपीक विमा कंपनीस्तरावर मंजूर करण्यात आलेला आहे, परंतु कंपनीद्वारा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. राज्य शासनाचा हिस्सा कंपनीकडे जमा न झाल्यामुळे कंपनस्तरावरून परतावा प्रलंबित असल्याची माहिती आहे.
मोर्शी, चांदूरबाजार तालुक्यांत सर्वाधिक सहभाग फळपीक विमा योजनेत ३३९२ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सर्वाधिक १३३० शेतकरी मोर्शी तालुक्यातील आहे. याशिवाय चांदूरबाजार ९२९, वरुड ५०६, अंजनगाव सुर्जी २५५, धामणगाव रेल्वे ९६, तिवसा ४३, चांदूर रेल्वे ३१, अमरावती ४. भातकुली ३, व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविलेला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







