गुडघ्यातलं वंगण संपतंय; करावी लागते शस्त्रक्रिया

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : योग्य आहाराअभावी वजनवाढ,व्यायामाचा अभाव, सकस आहाराकडे दुर्लक्ष, आदी कारणांमुळे ज्येष्ठांसह तरुणांमध्ये गुडघेदुखीची समस्या दिसून येत आहे. मात्र, वेळीच योग्य उपचार घेतल्यास आपण ही समस्या टाळू शकतो, जिल्ह्यात महिन्यातील १५ ते २० रुग्णांवर शस्त्रक्रिया होत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

गुडघा हा मांडीचे हाड आणि नडगीचे हाड यांच्यातील सांधा असतो आणि त्याच्या पुढील बाजूस वाटी असते. गुडघ्यामुळे शरीराच्या खालच्या भागाला स्थैर्य मिळते आणि लवचिकता येते. शरीरातील हाडे आणि सांधा महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, त्र, ‘आर्थरायटिस’ संधिवात झाला, तर हाडे कमजोर होऊन सांधेदुखीची समस्या निर्माण होते. सांधा म्हणजे गुडघा हासुद्धा तीन हाडे, गुडघ्याची वाटी आणि संधीबंधांनी तयार होतो. गुडघ्याचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मांडी घालून बसणे, पाय दुमडून बसणे आदी अनेक क्रियांमुळे गुडघ्यांच्या हालचाली अधिक होऊन तेथील हाडे झिजणे, तेथील वंगण कमी होणे किंवा अतिउष्णतेमुळे गुडघ्याला सूज येते. त्यामुळे गुडघ्याची समस्या सुरू होते. आणि त्रास सुरू होतो. संधिवातामुळे सांध्यातील वेदना सुरू होतात. हाडांची झीज झाल्यामुळे गुडघेदुखीही निर्माण होते, असे अस्थिरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

डॉक्टर, गुडघ्यातून कटकट आवाज येतोय ! सततच्या गुडघ्याच्या हालचालीने हाडांची झीज होत असते. त्यामुळे हालचाल

केल्यास गुडघ्यातून कटकट, असा आवाज येतो. अनेकदा उठताना बसताना गुडघ्यात वेदना होत असल्याच्या तक्रारी असतात.

गुडघ्यातील वंगण संपतंय गुडघ्याच्या सततच्या हालचालीमुळे गुडघ्यातील यंगण कमी होत असते. त्यामुळे गुडघेदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते.

सर्वांत जास्त तक्रारी मार लागल्याच्या अस्थिरोगतज्ज्ञांकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक तक्रारी यापूर्वी मार लागला होता, त्यामुळेच दुखणे सुरू असावे, अशी कारणे घेऊन येताना दिसून येतात. त्यावर मग उपचार करून घेतात.

 

स्थूलपणा, अतिरिक्त वजन यामुळे अनेकांना गुडघेदुखीची समस्या जाणवत असते, तर काहींच्या हाडांची झीज होऊन गुडघ्यातील वंगण कमी असल्याने दुखणे वाढत असते. यातील बऱ्याच रुग्णांना शस्त्रक्रिया करावी होत लागते, भविष्यातील हा धोका टाळण्यासाठी नियमित व्यायाम करावा, कॅल्शिअमयुक्त आहाराचा समावेश करावा, तसेच सतत गुडघे दुखत असतील,तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते.

डॉ. नितीन जयस्वाल, स्पाइन सर्जन

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013576
error: Content is protected !!