
बडनेरा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत अनारक्षित विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमरावती – मुंबई अनारक्षित (एक फेरी) विशेष गाडी क्रमांक ०१२१८ ही ५ डिसेंबर रोजी अमरावती येथून सायंकाळी ५:४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२५ वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२१७ ही ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२:४० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी दुपारी १२:५० वाजता पोहोचेल. बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) असे थांबे निश्चित केले आहेत. गाडीच्या संरचनेमध्ये १४ सामान्य, द्वितीय श्रेणीचे डबे राहतील. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या चैत्यभूमीला जाणाऱ्या प्रवाशांनी या विशेष गाड्यांची नोंद घ्यावी. प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







