विद्यार्थिनीची छेड काढल्यानंतर घेतले डांबून

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

परतवाडा/पथ्रोट : एका खासगी संस्थेच्या शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केले. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मंगळवारी शाळा गाठून त्याची चारचाकी फोडली. घाबरलेल्या शिक्षकाने स्वतःला वर्गखोलीत डांबून घेतले. या शिक्षकाला पथ्रोट पोलिसांनी सायंकाळी ७:३० वाजता बंदोबस्तात सुरक्षित ठिकाणी नेले. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. वृत्त लिहिस्तोवर फिर्याद देण्यासाठी पालक ठाण्यात दाखल झाल्याचे वृत्त आहे.

अचलपूर तालुक्यातील पथ्रोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिंदी येथील खासगी संस्थेच्या शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केले. हा प्रकार विद्यार्थिनीने घरी पालकांपुढे कथन केला. त्यामुळे पालकांसह संतप्त नागरिकांनी शाळेला घेराव घातला. त्यामुळे घाबरगुंडी उडालेल्या शिक्षकाने स्वतःला वर्गखोलीत डांबून घेतले. त्याला पथ्रोट पोलिसांच्या पथकाने बाहेर काढले. गावात पोलिस व एसआरपीएफचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

शिंदी येथे एका शिक्षकाने विद्यार्थिनीची विनयभंग केल्याची फिर्याद आहे. अजून विद्यार्थिनीचे बयाण झाले नाही. त्यानंतर सर्व प्रकरण स्पष्ट होईल. फिर्याद दाखल करणे सुरू आहे.

 

 

 

आठवड्यापूर्वी काढली छेड शिक्षकाने एक आठवड्यापूर्वी मुलीची छेड काढली होती. या कालावधीत मुख्याध्यापक सुटीवर होते. ते परतल्यानंतर मंगळवारी ग्रामस्थांनी शाळा गाठली आणि जाब विचारला. शिक्षकाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून ग्रामस्थ बिथरले.

– राहुल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी, अंजनगाव 

शिक्षकाचा ताबा द्या गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचे कृत्य करणाऱ्या त्या शिक्षकाला आमच्या ताब्यात द्या, असा नागरिकांचा धोशा होता. पोलिस येईपर्यंत ते उपस्थित होते. नागरिकांचा आवेश पाहून पोलिसांनी शिताफीने शिक्षकाला काढून सुरक्षितस्थळी अंजनगावला नेल्याची माहिती आहे. दुसरीकडे, शिक्षकाविरुद्ध फिर्याद दाखल करण्यासाठी विद्यार्थिनींचे पालक पथ्रोट पोलिस स्टेशनला दाखल झाले होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013577
error: Content is protected !!