
-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी वनपरिक्षेत्रात २५ नोव्हेंबरला वाघ मृतावस्थेत आढळला होता. त्यांच्या मृत्यू कारण विषप्रयोगातून झाल्याचे समोर आले आहे. शिकारीसाठी शिकाऱ्यांनी मृत शेळीवर विष टाकले. ही शेळी वाघाने खाल्ल्याने त्याचा विषबाधेतून मृत्यू झाला असावा, असे प्रथमदर्शनी वन विभागाच्या तपासातून समोर आले आहे.
या प्रकरणात वन विभागाच्या पथकाने आतापर्यंत सहा जणांना अटक केली असून, मंगळवार दिनांक ३ डिसेंबरला रात्री सातव्या आरोपीला संशयाच्या आधारे चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींकडून चार नखे जप्त केली आहेत. मात्र वाघाची १२ नखे, मिशी व अन्य काही अवयव गायब होते. वन विभाग शोध घेत आहे. वाघाला समोर १० व मागे ८ असे एकूण १८ नखे असतात. शिकार झालेल्या वाघाच्या मृतदेहाजवळ दोन नखे होती. तसेच चार नखे शिकाऱ्यांकडून जप्त केली.
-शिकारी टोळी संबंधाबाबतही तपास, शवविच्छेदनाची प्रतिक्षा वाघाची शिकार प्रकरणात सातव्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंतच्या तपासात या शिकाऱ्यांचा संबंध परराज्यातील शिकारी टोळीसोबत आढळून आलेला नाही. त्याबाबत तपास सुरू आहे. तसेच मृत शेळीवर विष टाकून वाघाला खाण्यासाठी ठेवली. शेळी खाल्ल्यामुळे वाघाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथ. अंदाज आहे. मात्र शवविच्छेदन अहवालाअंती नेमके कारण समोर येईल.
-अग्रीम सैनी, डीसीएफ, मेळघाट प्रादेशिक वन विभाग.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







