मुस्लिमांवरील अत्याचाराचा एमआयएमने नोंदविला निषेध
लातूर : उत्तरप्रदेशातील संभल येथील जामा मस्जिदमध्ये कोणतीही पूर्व सूचना न देता आणि मुस्लिम समुदायाला विश्वासात न घेता करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणावरून हिंसा भडकली. यावेळी पोलिसांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात सहा निष्पाप मुस्लिम युवकांचा मृत्यू झाला. या हत्याकांडाच्या निषेधार्थ लातूर येथे महात्मा गांधी चौकात एमआयएमच्यावतीने बुधवारी आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने चौकशी करावी, दोषी पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. मयतांच्या नातेवाईकाना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि जखमीना 10 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी. मुस्लिमांवरील अत्याचार बंद करावेत. आदी मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येऊन संभल हत्याकांडाचा तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बांधवानी मुस्लिमांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी लातुर शहर अध्यक्ष मुजीब हमदुले, औसा शहर अध्यक्ष सय्यद कलीम, ऍड.लालासाहेब शेख, मोहसीन खान, जन एकता संघटनेचे अध्यक्ष इरफान भाई शेख, वाजिद मनियार, इस्माईल फुलारी, शेख शफी साहेब, जुमेद भाई आतार आदींची भाषणे झाली.
या आंदोलनात एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष ऍड. मोहंमदअली शेख, शहराध्यक्ष मुजीब हमदुले, शहर कार्यकारी अध्यक्ष जावेद पटेल, शहर उपाध्यक्ष शेख सत्तार, शेख जावेद, अहमदखान पठाण, सय्यद कलीम, सय्यद इनाम, शेख वसीम, यासीन ख़ान पठान, फ़र्नाइस पठान, शेख जमील, शेख शकील मौलाना, समीर तांबोळी, उस्मान बागवाना, शेख इम्तियाज़, सय्यद रहीम, आरिफ़ ख़ान पठान, शेख गौस, सय्यद ज़ियाउद्दीन, आदिसह एमआयएमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा तर दंडनीय अपराध…
समाजात जातीय द्वेष निर्माण करणाऱ्या सरकारचा याप्रसंगी एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष ॲड. मुहम्मदअली शेख यांनी निषेध केला. भारतीय संविधानातील ‘प्लेस ऑफ वर्शिप ऍक्ट’चा दाखला देऊन कोणत्याही धार्मियांच्या धर्म स्थळाचे, पूजा स्थळाचे इतर धर्मात परिवर्तन करणे दंडनीय अपराध आहे. याचे भान पोलीस व सरकारला नाही. त्यामुळे देशातील मुस्लिमांवरील अत्याचार बंद करावेत, अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







