
सचिन एस इंगळे (प्रतिनिधी) : मेळघाट विधानसभा मतदार संघाचे आमदार केवलराम काळे यांनी नुकताच धारणी येथे जनता दरबार आयोजित केला असता बहुतांश शेतकऱ्यांनी विद्युत्त समस्येबाबत त्यांच्याकडे समस्या मांडल्या होत्या. या समस्या लक्षात घेत तात्काळ अचलपूर येथील कार्यकारी अभियंत्याचे दालन गाठत मेळघाटातील शेतकऱ्यांच्या विद्युत्त समस्या निकाली काढण्याबाबत चर्चा करत निर्देश दिले. मेळघाटातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या व्यवस्थेमुळे रब्बी पिकासाठी मशागत करत गहू, कांदा, भाजीपाला आदि पिकांची लागवड करतात. त्यासाठी विद्युत्त पुरवठा नियमित ठेवणे आवश्यक असते. शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी केली असतांना सतत विद्युत्त पुरवठा बंद राहतो. त्यांच्या समस्येकडे विद्युत्त कंपनीकडून दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके धोक्यात आली असुन आर्थीक विवंचनेत शेतकरी असतांना विद्युत्त विभागाकडून केल्या जात असलेले दुर्लक्ष चिंता जनक बाब असल्याने आमदार केवलराम काळे यांनी कार्यकारी अभियंता रविंद्र चौधरी यांच्याशी चर्चा करत समस्या निकाली काढण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी, व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







