टाकरखेडा येथे रानडुक्करांचा हैदोस; वनविभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सचिन इंगळे(प्रतिनिधी) : धारणी तालुक्यातील टाकरखेडा मधील शेतशिवारात रानडुकरांनी हैदोस घातला असून गव्हाचे शेत फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान होत आहे. टाकरखेडा शिवारातील ज्ञानदेव येवले यांच्या मालकीच्या शेतात गव्हाची पेरणी केली असून एक महिना झालेल्या गव्हाच्या शेतात रानडूकरांनी दररोज रात्रीच्या वेळी शेतात येऊन सर्व शेत उखरुन फस्त केल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामूळे शेतकरी त्रस्त झाले आहे. शेतात नागरणी, वखरणी, ट्रॅक्टर ने फंटा करून शेती तयार केली त्यानंतर महागडे बियाणे व खते घेऊन पेरणी केल्यावर डुकरांनी गहु फस्त केल्याने फार नुकसान होत आहे याबाबात वनविभागाला कळविले आहे वनविभागाने रान डूकरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013576
error: Content is protected !!