कामात कुचराई नको, घरकुल, जलजीवनची कामे तातडीने मार्गी लावा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : विधानसभा निवडणुकीमुळे प्रशासकीय कामकाज बरेच मागे पडले आहे. त्यामुळे आता घरकुल योजनासह, जलजीवन मिशन, पाणी पुरवठा व स्वच्छता, पंचायत संजीता महापात्र विभागातील प्रलंबीत कामात कुठल्याही प्रकारे कुचराई न करता विहित मुदतीत कामे मार्गी लावण्याचे निर्देश सीईओ संजीता महापात्र यांनी शुक्रवारी झेडपीत आयोजित आढावा बैठकी संबंधित खातेप्रमुख आणि १४ पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांसह १४ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सीईओंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल योजनेचा आढावा तसेच नळकनेक्शन, ग्रामपंचायतीमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या घंटागाडी आदीचा सीईओंनी विस्तुत आढावा घेवून सदरची कामे विहित मुदतीत निकाली काढण्याचे सूचना सीईओंनी दिल्या आहेत.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर कामे पूर्ण करावी अशा सूचना सीईओंनी दिल्यात. बैठकीत जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामपंचायत विभाग यांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी योजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, अडचणी आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. सीईओ संजीता महापात्र यांनी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अधिक प्रभावी कामगिरी करण्यावर भर दिला. तसेच, गावपातळीवरील विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी मांडल्या आणि त्या सोडविण्यासाठी उपाययोजनांचे प्रस्ताव दिले. बैठकीत निर्णय घेण्यात आले की, योजनांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी महिन्याला एक बैठक घेतली जाणार आहे. बैठकीस डीआरडीए प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, डेप्युटी सीईओ बालासाहेब बायस, पर्यवेक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत आणि सर्व पंचायत समितीचे बीडीओ उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013575
error: Content is protected !!