
वरूड तालुक्यातील जरूड येथील ट्रॅक्टर शेणखत आणण्याकरिता मध्य प्रदेशात नेला होता. परतीच्या पंकज काटचरपे वेळी पट्टन घाटात अचानक ट्रॅक्टरचे ब्रेक झाल्याने ट्रॉलीसह तो उलटला. यामध्ये ट्रॅक्टरवर बसलेले दोन ठार झाले, तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ च्या सुमारास मध्य प्रदेशात घडली.
सूत्रांनुसार, पंकज वासुदेवराव काटचरपे (३४, रा. जरूड), कौशल दिलीप टेकाम (२२, रा. बेनोडा शहीद) असे मृतांचे नाव आहे. गंभीर जखमींमध्ये संजय नामक चालकाचा समावेश आहे. जरूड येथील ट्रॅक्टर मध्य प्रदेशात शेणखत आणण्यासाठी पाठविण्यात आला होता. परतीच्या वेळी दुपारी १२ च्या सुमारास मध्य प्रदेशातील पट्टन घाटात अचानक ब्रेक लागल्याने ट्रॅक्टरसह ट्रॉली उलटली.यामध्ये ट्रॅक्टरवर बसलेले दोन मजूर जागीच ठार झाले. चालकाला वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु प्रकृती गंभीर असल्याने अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेची नोंद मुलताई (मध्य प्रदेश) पोलिसांनी घेतली. त्यांच्याकडून पंचनामा करण्यात आला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







