
नांदगाव खंडेश्वर : अमरावतीहून यवतमाळकडे जाणारी एमएच ०९ ईएम १६२९ क्रमांकाची शिवशाही बस रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला बाभळीच्या झाडाला धडकली.
अमरावती-यवतमाळ मार्गावर सावंगा फाट्यानजीक हा अपघात घडला. चालक मनोहर खासबागे व वाहक छाया इंगोले हे किरकोळ जखमी झाले. बसमध्ये दोन प्रवासी होते. ते सुखरूप असल्याचे एसटी महामंडळाच्या कार्यालयातील विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती कळताच अमरावती येथून एसटी महामंडळाचे विभागीय कार्यालयातील यंत्र अभियंता (चालन) स्वप्निल धनाड, विभागीय वाहतूक अधीक्षक योगेश ठाकरे व पंकज दांदरे ही मंडळी घटनास्थळी दाखल झाली होती.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 119







