
अमरावती : १४ वर्षांखालील ६८ व्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेला अमरावती येथे विभागीय क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. देशभरातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील मुलांचे ३० व मुलींच्या गटात २७ संघ दाखल झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) राजेंद्र गोगले, राज्य परिवहन अधिकारी कांचन जाधव, विदर्भ ॲमेच्युअर कबड्डी संघटनेचे सचिव जितू ठाकूर, एसजीएफआय पर्यवेक्षक तृप्ती अग्रवाल, उद्योजक नवीन खंडुजा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. सुभाष गावंडे, श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त नितीन चव्हाळ, एसजीएफआय सदस्य सुरेंद्र
शर्मा आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी प्रास्ताविक केले. मल्लखांब प्रशिक्षक नरेंद्र गाडे यांच्या मार्गदर्शनात मल्लखांबचे प्रात्यक्षिक मुले व मुलींनी सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमात प्रकाश मेश्राम व संचाने ‘इन्क्रेडेबल इंडिया’ ही संकल्पना सादर केली. संचालन निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये यांनी केले. आभार प्रदर्शन वाशिम येथील जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले.
मुलांच्या गटात कर्नाटक विरुद्ध पॉन्डिचेरी, सीबीएससी वेलफेअर विरुद्ध सीबीएसई सोटर्स संघ, एनव्हीएस उत्तराखंड विरुद्ध उत्तराखंड, गुजरात विरुद्ध पश्चिम बंगाल या संघांमध्ये सामने झाले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







