१५१ संस्थांच्या निवडणुकीची लगबग

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

 

अमरावती : जिल्ह्यात सहकार विभाग अंतर्गत १५१ संस्थांचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात संपुष्टात येत आहे. या संस्थांची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. यापैकी ‘ड’ वर्गीय सहकारी संस्थांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ६३ संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या पत्राची प्रतीक्षा आहे.

जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार – यांच्या मार्गदर्शनात सहकार विभागाद्वारा ‘ड’ वर्गीय ८८ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. यात मजूर सहकारी संस्था, बेरोजगारांच्या संस्था, पाणी वापर संस्था, औद्योगिक कामगार संस्था यासह अनेक लहान सहकारी संस्थांचा समावेश आहे. याशिवाय पतसंस्था, सहकार सोसायटीसारख्या ३७ ‘ब’वर्गीय सहकारी संस्था व १० लाखांच्या वर व्यवहार असणाऱ्या ‘क’ वर्गीय सहकारी संस्थांच्या निवडणूक अद्याप प्रलंबित आहेत. यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेशाची प्रतीक्षा आहे.

डिसेंबरअखेर प्राधिकरणाचे आदेश प्राधिकरणाद्वारा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यामुळे ६६ सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता संपुष्टात आलेली आहे. मात्र, मुदतवाढीचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण द्वारा याबाबतचे पत्र देण्यात येणार असल्याची सहकार विभागाची माहिती आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013576
error: Content is protected !!