अमरावती : ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, या निराधार आभाळाचा तोच भार वाहे’ अशा सार्थ ओळींप्रमाणे शहरात कुठेही निराधार स्थितीत आढळलेल्या बेवारस मृतदेहांवर अमरावती महापालिका अंत्यसंस्कार करण्याचे महत्कार्य करीत आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला स्थानिक हिंदू स्मशानभूमीच्या व्यवस्थापनाचे सहकार्य लाभते.
बेवारस प्रेत आढळल्यावर पोलिस नोंदी आणि तपास होतो. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मरणोत्तर शल्यचिकित्सा केली जाते. त्यानंतर बेवारस व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो. शोध घेऊन कोणीही नातेवाइक न सापडल्यास बेवारस मृत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठीचे पत्र संबंधित पोलिस ठाणे व महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला देण्यात येते. त्यानंतर अंत्यसंस्काराच्या परवानगीचा आदेश दिला जातो.
महापालिकेतर्फे पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेतला जातो आणि नंतर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात.
आर्थिक वर्षात ६५ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार जिल्हा सामान्य रुग्णालय व महापालिका यांच्या संयुक्त पुढाकारातून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. महापालिकेच्या स्वच्छता विभागानुसार, १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात एकूण ६५ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यानचा आकडा दहाच्या घरात आहे.
सामाजिक जाणिवेतून शहरातील काही सामाजिक संस्थादेखील सामाजिक बांधिलकी जोपासून व सामाजिक जाणिवेतून बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतात.
प्रत्येक अंत्यसंस्काराचा खर्च किती?महानगरपालिकेचा हिंदू स्मशानभूमी व्यवस्थापनाशी तीनवर्षीय करार आहे. त्यानुसार १५०० रुपये प्रतिमृतदेह असा खर्च दिला जातो.
कोण पार पाडतो ही जबाबदारी ?
जिल्हा सामान्य रुग्णालयाने नेमलेला प्रतिनिधी व संबंधित ठाण्याचा कर्मचारी बेवारस मृतदेहाबाबत महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार करतो. त्यानंतर महापालिका प्रशासन त्या बेवारस व्यक्तींच्या मृतदेहांच्या एकूणच वर्णनाची नोंद घेते.
रोजचेच काम ‘हिंदू स्मशानभूमीत गेल्या कित्येक वर्षापासून काम करीत आहे. शेकडो हजारो मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले असतील. बेवारस मृतदेहांचेदेखील अंत्यविधी पार पाडले.
एक कामगार
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







