
-सचिन इंगळे (प्रतिनिधी) :महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चिखलदरा येथील गिरिजन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत देणगीदारांच्या हस्ते शाळेला संविधानाच्या प्रती देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद अशरफ भाई होते. यावेळी समाजसेवक पंजाबराव नाईक, माजी उपनगर अध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, पत्रकार संघाचे तहसील अध्यक्ष मनोज शर्मा, मुख्याध्यापक मोहन चव्हाण, नारायण येवले, शिक्षण विस्तार अधिकारी अलका बोंडे, कृष्णकला चुंदे, विषय तज्ञ सर्वश्री कृष्णा लुटे, आनंदराव वानखडे आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आनंदराव वानखडे यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या २५ प्रती शाळेच्या वाचन कक्षाला देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक अजय सोळंके, सुनील चव्हाण, श्रीकांत वानखडे, गणेश दांडगे, तुषार चारोडे, हेमंत बक्षी यांनी प्रयत्न केले. संचालन माधुरी तायडे यांनी केले. गणेश दांडगे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी संजय दाखली, नंदकिशोर मारुडकर, किरण वर्मा यांनीही कार्यक्रमात सहकार्य केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






