आमचे पालक; आमचे मंत्री! अंबानगरीत लागले बॅनर्स

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : राज्यात महायुतीला बंपर बहुमत मिळूनही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. तो केव्हा होईल, हे अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसतानाही महायुतीतील अनेक आमदारांनी मंत्रिपदावर दावा ठोकला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांची छबी असलेले ‘आमचे पालक; आमचे मंत्री’ जनतेचा नेता’ असे फलक लक्षवेधक ठरले आहेत. आ. रवी राणा यांच्या संभाव्य मंत्री व पालकमंत्रीपदासाठी ती बॅनरबाजी करण्यात आली आहे. विधानसभेत महायुतीचे २३६ आमदार असताना मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मात्र अनेकांनी मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. जिल्ह्यातून बडनेराचे आमदार रवी राणा, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके व धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. यातील रवी राणा चौथ्यांदा, सुलभा खोडके तिसऱ्यांदा व प्रताप अडसड हे दुसऱ्यांदा विधिमंडळात पोहोचले आहे. त्यापार्श्वभूमीवर अमरावतीतून राणा यांना कॅबिनेट मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद मिळावे, अशी त्यांच्या समर्थकांची प्रबळ व मनोभावे इच्छा आहे. त्यासाठी युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी माता अंबा-एकवीरेची महाआरती करून साकडे घातले.बुधवारी स्थानिक मध्यवर्ती चौकात थेट पालकमंत्रिपदाची मागणी न करता ‘आमचे पालक; आमचे मंत्री’ जनतेचा नेता अशी वाक्य असणारे फलके लावण्यात आली आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013564
error: Content is protected !!