विमानतळावर वन्यप्राण्यांशी क्रूरता, अप्रशिक्षितांकडून रेस्क्यू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : येथील बेलोरा विमानतळाच्या परिसरात असलेले वन्यप्राणी सुरक्षितपणे रेस्क्यू न करता त्यांच्याशी क्रूरता केली जात आहे. एवढेच नव्हे तर अप्रशिक्षित खासगी व्यक्तींकडून या वन्यप्राण्यांना पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.

बुधवारी तारेच्या कुंपणात अडकून रोहीचा एक बछडा जखमीदेखील झाला. त्यामुळे वन्यप्राण्यांबाबत वनाधिकारी किती सजग आहेत, हे त्यांच्या कर्तव्यावरून स्पष्ट होते, हे विशेष. बेलोरा विमानतळाचे विविध विकासकामे पूर्णत्वास आली आहेत. येत्या नवीन वर्षात विमानांचे ‘टेक ऑफ’ करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण सज्ज व आहे. मात्र, बेलोरा विमानतळाच्या परिसरात असलेले वन्यप्राणी हे विमानाच्या अपघातासाठी कारणीभूत ठरणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने हे वन्यप्राणी सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यासाठी आवश्यक साहित्य, मनुष्यबळ आणि इतर बाबींसाठी लागणारा खर्च म्हणून वनविभागाकडे ५५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. विमानतळाच्या आतमध्ये सुमारे २५० ते ३०० वन्यप्राणी असल्याचा अंदाज आहे. दोन महिन्यांपासून विमानतळावर वन्यप्राणी रेस्क्यूसाठी वनविभागाकडून ‘बोमा’ प्रणाली साकारण्यात आली. प्रारंभी मोजकेच वन्यप्राणी हे या प्रणालीच्या आतमध्ये शिरले होते. मात्र, हे वन्यप्राणी ‘बोमा’ प्रणालीला हुलकावणी देत होते.

अखेर वन्यप्राणी रेस्क्यू करण्यासाठी वनकर्मचाऱ्यांसह खासगी व्यक्तींचीही मदत घेण्यात आली. तथापि, खासगी व्यक्तींना वन्यप्राणी रेस्क्यू करण्याचे काडीचे ज्ञान नाही. वन्यप्राणी पकडले.

की त्यांना वाहनापर्यंत नेण्याची जबाबदारी ही खासगी व्यक्ती करीत असल्याचे दिसून येते. वन्यप्राणी रेस्क्यू करताना वन्यप्राण्यांना कुरतेची वागणूक दिली जात आहे.

 

सहायक वनसंरक्षक नियंत्रणात ‘फेल’बेलोरा विमानतळाच्या आतील भागात वन्यप्राणी सुरक्षितपणे बाहेर काढण्याची जबाबदारी वरिष्ठांनी सहायक वनसंरक्षकांवर सोपविली होती. मात्र, बेलोरा विमानतळावर वृक्ष कटाई परवानगीतसुद्धा गौडबंगाल असून झाडांच्या ‘लॉगिंग’मध्ये तफावत आढळून आली आहे. आता तर वन्यप्राणी रेस्क्यू करण्यासाठी अप्रशिक्षित खासगी व्यक्तींना नेमण्यात आल्याने नेमके वनविभागात काय सुरु आहे, हेच कळेनासे झाले आहे. एकंदरीत वन्यप्राणी रेस्क्यू नियंत्रणात सहायक वनसंरक्षक हे ‘फेल’ झाल्याचे वास्तव आहे

‘बोमा मध्ये वन्यप्राणी हुलकावणी देत होते. त्यामुळे बेलोरा विमानतळात असलेले वन्यप्राणी नैसर्गिकरित्या बाहेर काढण्याला प्राधान्य देण्यात आले. आता मोजकेच वन्यप्राणी आतमध्ये असून ते देखील लवकरच बाहेर काढले जातील. वन्यप्राण्यांशी करता असा काही प्रकार निदर्शनास आलेला नाही.

– जयंत वडतकर, मानद सदस्य वन्यजीव, अमरावती

झाडांच्या ‘लॉगिंग’ प्रकरणाचे पुढे काय? बेलोरा विमानतळावर वृक्ष कटाईच्या ‘लॉगिंग’ मध्ये गडबड आढळली आहे. सबब, उपवनसंरक्षकांच्या आदेशानुसार संबंधित वनपालांना समज देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, चौकशी अधिकारी हे प्रकरण वेगळ्ळ्या दिशेने घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे झाडांचे ‘लॉगिंग’ प्रकरण पुन्हा फाईलबंद तर होणार नाही ना? अशी चर्चा वनविभागात रंगू लागली आहे.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013564
error: Content is protected !!