निष्काळजीपणे वाहन चालवीने भोवले
चिखली/बुलढाणा : चिखली कडून भरधाव वेगाने धावणाऱ्या आरटीओ च्या सरकारी वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून मोटारसायकल स्वारला जोरदार धडक देवून उडविले. ही घटना अंढेरा ते दे मही रोडवरील पेट्रोल पंपा जवळ 17 डिसेंबर रोजी दुपारी घडली.
जिल्हा आरटिओ विभागाअंतर्गत वाहतुकीचे नियम पालन करण्याचे धडे देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी हेच आता सुरक्षेच्या कारणावरून चर्चेचा विषय बनलेला आहे .चिखली कडून दे राजा हायवे वर अवैध वसुली करिता भरधाव वेगाने निघालेल्या वाहन क्र एम एच 04 एल टि 6728 या स्कोर्पिओ गाडी चालकाने निष्काळजी पणे वाहन चालवून दे मही पट्रोल पंपा जवळ मोटार सायकल क्र एम पी 68 एम डी 1291 ला जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात वाहणाचे मोठे नुकसान झाले असून मोटार सायकल स्वार गंभीर जखमी झाले.
ही घटना दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी दे मही जवळ घडली. झालेल्या अपघातात आरटीओच्या स्कोर्पिओ गाडीचे समोरचे टप्पर व लाईट व टायर सुद्धा फुटले आहे, ह्या आरटीओच्या स्कोर्पिओ गाडीने चिखली ते दे मही नॅशनल हायवे रोडवर धुमाकूळ घातला असून ट्रक व इतर गाड्यांचा पाठलग करणे व त्या गाडी चालकाकडून चिरीमिरी घेऊन गाड्या सोडून देणे हेच काम सुरु आहे अगोदरच ट्राफीक पोलीस कर्मचारी यांनी मेहकर फाटा व इतर ठिकाणी हप्ते घेण्याची चर्चा जनतेमध्ये पसरली असून आता त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या काही खाजगी एजन्ट लोकांना अवैध वसुली करिता वरिष्ठ अधिकारी यांनी खुली सूट दिली का याची शंका निर्माण झाली आहे.
आता या अपघातात नुकसान झालेल्या वाहणाची व जखमीची भरपाई कोण देणारं? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. एकीकडे आरटिओचे अधिकारी दुसऱ्यांना गाडी हळू चालवा, हेल्मेट वापरा हे सांगणारेच स्वतःचं नियमांच उल्लंघन करत असतील तर त्यांना शासनाचे नियम माहीत असतांना 90 च्या स्पीड ने गाड्या चालवीने वाटेल त्या ठिकाणी गोरगरीब वाहन चालका कडून अवैध वसुली करणे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई होत नसल्याची माहिती आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






