जलजीवन मिशनची कामे निधी नसल्यामुळे रखडली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

पुसद  : तालुक्यामध्ये केंद्र शासनाच्या वतीने ” हर घर जल ” या योजनेअंतर्गत संपूर्ण ग्रामीण भागातील प्रत्येक घरी पिण्याचे मुबलक पाणी मिळावे याकरिता नळ जोडणी, पाण्याची टाकी व पाण्याची विहीर हे चल जीवन मिशनच्या माध्यमातून निर्माण करण्याचे काम तालुक्यात सुरू होते. तर तालुक्यामध्ये दोन ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम निर्माण केल्यामुळे संबंधित पाण्याची टाकी कोसळण्याचा प्रकारही घडला होता.

तर सुदैवाने यामध्ये कोणताही मजूर जखमी झाला नाही. सुरुवातीला  जल जीवन मिशनच्या कामाने तालुक्यात वेग घेतला होता. मोठ्या प्रमाणात कामांची निर्मिती कंत्राटदारणमार्फत करण्यात येत होती. तर अनेक गावांची कामे वादग्रस्तही ठरत गेली. तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये जलजीवन मिशनचे कामे अर्धवटच राहिली आहेत. केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षा पूर्ण या योजनेचा उद्देश आता बारगळल्यासारखा दिसत आहे. कारण कंत्राटदारांनी निर्माण केलेल्या कामांची गुणवत्ता पण तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

तर गेल्या काही महिन्यांपासून  जलजीवन मिशन च्या कामांची बिले निघाली नाहीत. निधीच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक कंत्राटदार वैतागले आहेत तर अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. तर कामे रखडल्यामुळे ती कामे कधी पूर्णत्वास येणार, व नागरिकांना पिण्याचे मुबलक पाणी कधी मिळणार? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने चल जीवन मिशनच्या हेड खालील निधी त्वरित उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तरच या योजनेचा खरा उद्देश सफल होईल व नागरिकांना मुबलक पाणी मिळण्याचा रस्ता मोकळा होईल.

शहरातही 67 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना नळ जोडणीचे  काम गुजरात येथील एक कंपनी करीत आहे. या कंत्राटदाराने गुजरात वरूनच सर्व साहित्य मजूर सुद्धा आणले आहेत. आता गुजरातने पुसद तालुक्याचा रोजगारही पळविला आहे. तर संबंधित कंत्राटदाराकडून केल्या जात असलेल्या शहरातील या कामांमुळे मात्र चांगल्या रस्त्यांची खोदल्यामुळे वाट लागत आहे. या गंभीर बाबीकडे मात्र आता प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. हे विशेष.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013564
error: Content is protected !!