
चिखलदरा : तालुक्यात वर्षभरात एकूण ३३० विविध गुन्ह्याची नोंद पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे.दोघांची हत्या, तर १७ अपघातांमध्ये १२ जण ठार झाले. त्यापैकी पुलाखाली कोसळलेल्या खासगी बसच्या अपघातात मृतांची संख्या ६ झाली. परतवाडा-इंदूर मार्गावरील सेमाडोजवळ हा भीषण अपघात झाला होता, तर तालुक्यात १०० पेक्षा अधिक दारूबंदीच्या कारवाया झाल्या आहेत.
चिखलदरा तालुक्यांतर्गत एक पोलिस ठाणे, तर काटकुंभ आणि सेमाडोह येथे दोन पोलिस चौकी आहेत. ५४ ग्रामपंचायतींमध्ये दीडशेपेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. चिखलदरा तालुक्यातीलच अनेक गावांचा समावेश धारणी, पथ्रोट, परतवाडा, अंजनगाव, अकोट या पोलिस ठाण्यांमध्ये केला आहे.
शंभरपेक्षा अधिक दारूबंदीच्या कारवाया जिल्ह्यात सर्वात शांत पोलिस ठाणे म्हणून चिखलदराची ओळख आहे. तालुक्यातील इतर गावे विविध पोलिस ठाण्यांत जोडण्यात आली आहे. वर्षभराच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर चिखलदरा तालुक्यांतर्गत ३३० एकूण गुन्हे घडले. दोन हत्या, १२ बलात्कार, आठ मुलींना पळवून नेले. १०० दारूबंदीच्या कारवाया करण्यात आल्या, तर अपघात १७ त्यामध्ये १२ ठार झाले, मर्ग ४६. (आकस्मिक विविध कारणांनी मृत्यू फसवणूक २ व इतर गुन्हे घडले आहेत.
जीवघेण्या रस्त्यावर सहा ठार परतवाडा-सेमाडोह-धारणी-इंदूर हा आंतरराज्य महामार्ग आहे. अपघाताची मालिका दररोज आहे. घाट वळणाचा हा मार्ग आहे. इंग्रजकालीन पूल आणि अरुंद रस्ते जिवावर उठले आहे. अपघातासाठी उपाययोजना म्हणून तब्बल ५२ गतिरोधक मार्गावर टाकण्यात आले आहे, मध्य प्रदेशातून येणारी वाहतूक त्यामुळे कमी झाली आहे, परंतु वाहनधारकांसाठी जीवघेणी ठरली आहे. सेमाडोहनजीक खासगी बस पुलाखाली कोसळली होती. अनेक जण जखमी झाले, तर तब्बल सहा जणांचा त्यात मृत्यू झाला. हा सगळ्यात मोठा अपघात सरत्या वर्षात ठरला आहे. मार्गाचे काम न झाल्यास अपघातांची मालिका मात्र कायमच आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






