
रिद्धपूर : राज्य सरकारने सुशिक्षित बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेच्या प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी युवक प्रशिक्षणार्थीनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनातील मागणीनुसार ९ जुलै २०२४ रोजी सुशिक्षित बेरोजगारांसाठी महाराष्ट्र सरकारने युवा कार्य प्रशिक्षण या योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेतील राज्यातील १२ वी पास, आयटीआय पदवीधर अशा सुशिक्षित बेरोजगार युवकांना ६ हजार, ८ हजार, १० हजार विद्यावेतन देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार सुशिक्षित बेरोजगारांना जि.प. शाळा, ग्रामपंचायत, बँक, सरकारी कार्यालयात ६ महिन्याच्या कालावधीकरिता रोजगार म्हणून कामाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. परंतु आता ६ महिने प्रशिक्षणाचे पूर्ण होत असल्यामुळे पुन्हा सुशिक्षित बेरोजगार होणार आहे. त्यामुळे या योजनेचा ६ महिन्याचा कालावधी वाढून प्रशिक्षणार्थ्यांची पात्रतेप्रमाणे कायमस्वरुपी रोजगार देण्यात यावा, विद्या वेतनमध्ये वाढ करावी अशी मागणी ग्रामीण भागातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी आकिब अहेमद मो शकील, हर्षल फरतोडे, विनय डाहके, राहुल उभाड यांनी केली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






