इर्विनमध्ये एका बेडवर दोन रुग्ण, डॉक्टर वेळेवर येत नसल्याचीही ओरड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील ओपीडीमध्ये बेडची संख्या कमी असल्याने बेडसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची चांगलीच धावपळ झाली. शनिवारी रुग्णालयात एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच ओपीडीमध्ये डॉक्टर राहत नसल्याने वेळेत उपचार मिळत नसल्याची ओरड काही रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात आली.

इर्विन रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण येत असतात. परंतु, त्या तुलनेत रुग्णालयातील सोयी-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. तसेच रुग्णालयातील मनुष्यबळ देखील कमी असल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय होत असल्याचे चित्र रुग्णालयात पाहायला मिळत आहे. अनेक डॉक्टर हे ओपीडीच्या वेळेत उशिरा रुग्णालयात येतात. तर दुपारी १ वाजताच निघून जातात. तसेच सुट्टीच्या दिवशी वॉर्डात गुरुवारी रुग्णालयातील बहुतांश वॉर्डात एका बेडवर दोन रुग्ण, तर काही वॉर्डात रुग्णांनी खाली झोपण्याची वेळ आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

वॉर्डाच्या नियमित स्वच्छतेकडे द्यावे लक्ष इर्विन रुग्णालयातील अनेक वॉर्डामध्ये कमालीची दुर्गंधी पसरली आहे. त्याचा दर्प रुग्ण व नातेवाईकांमध्ये झिणझिण्या उठवितात. याशिवाय परिसरातही ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे.

वॉर्ड क्र. ८ देखील बंदावस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्र. आठ येथे २० खाटांचे आयसीयू विभाग होत असल्याने हा वॉर्ड मागील महिना भरा पासून बंद आहे. त्यामुळे याठिकाणी भरती होणारे मेडिसिनचे रुग्ण आता वॉर्ड क्र. १३ मध्ये भरती केले जात आहे. एकीकडे रुग्णांची वाढती संख्या, तर दुसरीकडे अपुऱ्या सोयी-सुविधा यामुळे रुग्णांचे हाल होत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013576
error: Content is protected !!