अर्धांगवायूचा त्रास; ९४ वर्षीय वृद्धाने पेटवून घेतले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती / बडनेरा : दीर्घ आजाराला कंटाळून एका ९४ वर्षीय वृद्धाने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना १ मे रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी येथे उघडकीस आली. श्यामराव देवराव ढोरे (रा. म्हाडा कॉलनी, बडनेरा) असे मृताचे नाव आहे.श्यामराव यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते आजारी होते. नित्यनियमाचे काम करतानाही त्यांना त्रास होत होता. त्यामुळे ते नेहमी निराश राहत होते. दरम्यान, ३० एप्रिल रोजी रात्री ते घरातील वरच्या माळ्यावरील आपल्या खोलीत झोपायला गेले. त्यांचा मुलगा, सून व नातू खाली झोपले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांचा मुलगा व सून जागी झाले. त्यांनी श्यामराव यांच्या खोलीकडे जाऊन बघितले. त्यावेळी श्यामराव यांनी पोर्चमध्ये वाळायला घातलेले कपडे अंगावर घेऊन स्वतःला जाळून घेतल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी श्यामराव यांच्या अंगावर पाणी टाकून आग विझविली. तसेच तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्यामराव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मृत श्यामराव यांच्या सुनेने बडनेरा ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यांचे पार्थिव पाहून अनेकजण गहिवरले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013576
error: Content is protected !!