मिरची पूड फेकून लुटणारे त्रिकूट जेरबंद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्याकडील २ लाख ९१ हजार ३३५ रुपयांचा ऐवज असलेली बॅग हिसकाविणाऱ्या गुन्हेगारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ रोजी अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एलसीबीनुसार, सचिन ऊर्फ शिवा वासुदेव सोळंके (२५), ज्ञानेश्वर वासुदेव सोळंके (२२, दोघेही रा. जांभा बुद्रुक, अकोला) व कार्तिक नंदू पवार (२४, रा. बोरज, अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सावंगी मग्रापूर येथील आदित्य दांडगे (२०) हा धामणगाव रेल्वे येथे भारत फायनान्स कंपनीच्या शाखेत कार्यरत असून तो २५ एप्रिल रोजी दुचाकीने मंगरुळ दस्तगीर येथून वसुलीची रक्कम घेऊन धामणगाव रेल्वे येथे जात होता. मार्गात मागून दुचाकीने आलेल्या तिघांनी त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्याजवळील २ लाख ७९ हजार रुपये, टॅब, बायोमेट्रिक मशीन असा २ लाख ९१ हजार ३३५ रुपयांचा ऐवज असलेली बॅग हिसकावून पळ काढला होता.

असा झाला उलगडा तपासात हा गुन्हा सचिन ऊर्फ शिवा सोळंके याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने सचिन व त्याचा भाऊ ज्ञानेश्वर या दोघांना जांभा येथील ऑटो स्टॅण्डवरून ताब्यात घेतले. चुलत मामा कार्तिक पवारसोबत मिळून उधारीचे पैसे फेडण्यासाठी व कौटुंबिक कामाकरिता पैशाची अत्यंत निकड असल्याने हा गुन्हा केल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींकडून १ लाख ३० हजार रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी व तीन मोबाइल जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013576
error: Content is protected !!