घरगुती वादातून चुलतभावाची हत्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : घरगुती वादातून एका तरुणाने २६ वर्षीय चुलतभावाची चाकूने भोसकून हत्या केली. खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खरकाडीपुरा येथील मंदिराजवळ २ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. प्रतीक प्रवीण जोशी (२८, रा. खरकाडीपुरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी चुलतभाऊ सुमित जोशी (२६) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला.

पोलिस सूत्रांनुसार, प्रतीक जोशी व सुमित जोशी हे परस्परांचे चुलतबंधू आहेत. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास घरालगतच्या हर्षलता मंदिरानजीकच्या रस्त्यावर घरगुती कारणावरून त्या भावांमध्ये जोरदार वाद झाला. वादादरम्यान आरोपी सुमित जोशी याने प्रतीकवर चाकूने सपासप सहा वार केले. त्याला रक्तबंबाळ व मरणासन्न स्थितीत टाकून आरोपी सुमित जोशी तेथून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच खोलापुरी गेटच्या ठाणेदार स्वाती पवार यांनी त्वरेने घटनास्थळ गाठले तथा पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. भररस्त्यात झालेल्या त्या घटनेचे अनेक जण प्रत्यक्षदर्शी असल्याने त्यातील काहींचे बयाण नोंदविले. खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013576
error: Content is protected !!