
चिखलदरा : सर्वत्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळालाही त्याचा फटका बसला आहे. येथील तापमान केंद्रावर ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असताना, अगदी अल्प प्रमाणात पर्यटक येत आहेत. पर्यटकांनीही पाठ फिरवल्याची स्थिती स्थानिक अनुभवत आहेत.
विदर्भाचे नंदनवन समजले जाणारे व थंड हवेचे ठिकाण अशी ओळख बाळगणारे चिखलदरा पर्यटनस्थळ पूर्णपणे ओस पडले आहे. या ठिकाणी पारा ३३ ते ३४ अंशांवर गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी पाठ फिरवली. पर्यटकांअभावी चिखलदरात शुकशुकाट बघायला मिळत आहे. मे महिन्यात अधिक ऊन तापू लागल्याने पारा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे बोडके पडलेले रान हिरवे झाल्याने काहीसा गारवा होता. परंतु, मागील आठवड्या पासून उन्हाचे चटके पर्यटन स्थळा वर जाणवू लागले आहेत.विदर्भाच्या नंदनवन चिखलदऱ्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली.
वाढती वृक्षतोड चिंतेचा विषय चिखलदरा पर्यटन स्थळाला लागून मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि वनविभागाचे मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्यामध्ये सतत अवैध वृक्षतोड पाहता, तापमान वाढण्याचे कारण मानले जात आहे
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






