अंजनगाव सुर्जी येथे बहरली थंडी गुलाबी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : ओंकार स्वरूपा सांस्कृतिक कला अकादमी अंजनगाव सुर्जी द्वारा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सावित्री-जिजाऊ जयंती निमित्य दि.13 जानेवारी 2025 प्रभा मंगलम अंजनगाव येथे *थंडी गुलाबी* हिंदी आणि मराठी गीतांचा बहारदार ऑर्केष्ट्रा चे आयोजन करण्यात आले होते. अकादमी चे संस्थापक अध्यक्ष धर्मराज शिरोळे व त्यांचे पदाधिकारी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात.प्रस्तुत प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सावित्री-जिजाऊं चे पूजन करून अकादमीचे मार्गदर्शक डॉ. राजेंद्रजी कोकाटे यांनी जिजाऊ वंदना म्हटली व पुढील वाटचालीस अकादमी ला सदिच्छा दिल्या.आणि कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.विलास कविटकर यांनी सावित्री जिजाऊं च्या कार्याचे महत्त्व पटवून सांगितले तर सावित्री जिजाऊ व इतर महान मातांचे चे अनुयायी व्हावे हि अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष देविदास भाऊ नेमाडे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.श्रीकृष्ण गोरडे यांनी केले व सावित्री जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तर आभार प्रदर्शन श्री सुदर्शन टोपरे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन श्री वासुदेव काळे यांनी केले.
या कार्यक्रमात अकादमीचे संस्थापक अध्यक्ष तथा ओंकार स्वरूपा ऑर्केष्ट्रा चे संचालक प्रसिद्ध गायक धर्मराज शिरोळे व त्यांचे सोबतीला असलेल्या गायीका यांनी किशोर कुमार, मुकेश,मोहम्मद रफी, या गायकांची अजरामर गीते सादर करून रसीकांना मंत्र मुग्ध करून हजारो रसिकांची मने जिंकली. अकादमीच्या वतीने गेल्या १७ वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून अंजनगाववासी या कार्यक्रमाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात.आणि दरवर्षी या कार्यक्रमाला हजारो रसिक महिला पुरुष आवर्जून उपस्थित असतात. या प्रसंगी ग्रामीण पत्रकार संकटनेचे ता. अध्यक्ष कुशल चौधरी यांचा अकादमी चेे पदाधिकारी तथा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथि श्री रमेश बुंदेले माजी आमदार, दादाराव डोल्हारकर मुख्याधिकारी न,प,अंजन, सुनील उमक प्रशासकीय अधिकारी न,प,अंजन, गजानन चक्रनारायण कर अधिकारी न,प, अंजन, पंकज गुप्ता परतवाड़ा, मोहन विधळे चांदूर बाजार,शैलेश लोखंडे परतवाड़ा, उमेश भोंडे, उपस्थित होते,कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता अकादमीचे पदाधिकारी डॉ.राजेन्द्र सरोदे,दिपक जावरकर,धिरज जयस्वाल, राजेश गुरव,संजय कहाने, गजानन लेंधे, रविंद्र सोनटके, साै संगीता गोरडे, साै संगीता काळे, साै लता शिरोळे,साै हेमलता लेंधे यानी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी धर्मराज शिरोळे यांचे सोबत सर्व रसीकांनी संत गाडगे महाराज यांचे गोपाला गोपाला,देवकी नंदन गोपाला हे गीत गायीले तेव्हा संपुर्ण हाँल या नाम गजरात दुदुमला होता.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013552
error: Content is protected !!