मिशन मनरेगाचे महासंचालक मेळघाट दौऱ्यावर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सेट्रीज व मनरेगा यांच्या संयुक्त उपक्रम अंतर्गत कुलांगना बु. प्रत्येक शेताला पानी आणि हरित आच्छादनसाठी ( फळबाग लागवड आणि जलसंधारण) आराखडा चे अनुषंगाने आ.नंदकुमार सर (महासंचालक,मिशन मनरेगा)यांच्या मार्गदर्शनात गावकऱ्यांशी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
मनरेगाच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थीना बांध बंदिस्थी, फळबाग लागवड, सिंचनाची व्यवस्था, आणि जलतारा योजनेचा लाभ देऊन लखपती शेतकरी करण्याच्या उद्देशाने आराखडा तयार करण्यात आला आहे त्या बाबत गावकऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
दुपारी पंचायत समिती अचलपूर येथे चिखलदरा आणि धारनी येथील गटविकास अधिकारी, तहसीलदार, कार्यक्रम सहायक अधिकारी, तांत्रिक अधिकारी आणि टिम सेट्रीज यांची बैठक घेण्यात आली.आणि यामध्ये देखील धारनी आणि चिखलदरा मधील 200 गावांचे आराखडा तयार करण्यासाठी सूचना देण्यात आल्या.
सेट्रिज च्या माध्यमातुन फळझाड लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात नंदकुमार सरांनी भेट दिली व शेतकऱ्यांशी चर्चा केली.
सेट्रिज आणि मनरेगा यांच्या माध्यमातुन सर्व गावांचा विकास होईल असा विश्वास आ. नंदकुमार सरांनी व्यक्त केला.
यावेळी आ. नंदकुमार सर (महासंचालक, मिशन मनरेगा), श्री. राजेंद्र शहाडे (राज्य गुणवत्ता नियंत्रक), श्री.निलेश घुगे (राज्य प्रशिक्षण समन्वयक), श्री.सुमित गोरले (मनरेगा), आ.आबा लाड (सेट्रिज )यांच्यासोबतच मा. उपजिल्हाधिकारी, मा. तहसीलदार (धारनी, चिखलदरा,अचलपूर), मा. गटविकास अधिकारी (धारनी, चिखलदरा, अचलपूर), मा.कृषी अधिकारी, कार्यक्रम सहायक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, टीम पाणी फाउंडेशन व टीम सेट्रिज हे सर्व उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013552
error: Content is protected !!