मेळघाटातील महिलांच्या सक्षमीकरणास मानव विकासाचे सर्वाधिक कार्य होणे गरजेचे -आ.केवलराम काळे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) चिखलदरा:
नगरपरिषद व खादी ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती क्लस्टर शहापूर यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे उभारण्यात आलेल्या मानव विकास मिशन अंतर्गत प्रशिक्षित महिलांच्या निर्मित वस्तू दालनाचे उद्घाटन आज आमदार केवलराम काळे यांनी २६ जानेवारी २०२५ गणतंत्र दिनाच्या मुहूर्तावर चिखलदरा येथे केले. त्यावेळी मेळघाटातील महिलांच्या सक्षमीकरणास मानव विकासाचे कार्य सर्वाधिक होणे गरजेचे असल्याची भूमिका आमदारांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास नगरपरिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह सोमवंशी , नगरपरिषद कर्मचारी वर्ग आणि नंदनवन शहर स्तरीय संघाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मानव विकास प्रशिक्षण दरम्यान तयार केलेल्या विविध वस्तूंची पाहणी आमदार केवळ राम काळे यांनी करून खाद्य वस्तूंचा आस्वादही घेतला. यामध्ये महिलांद्वारे तयार केलेले वनउपज पदार्थ मोहा लाडू, बेहडा, हिरडा, आवळा ,जांभूळ, पावडर ,बांबू पासूनतयार केलेल्या विविध वस्तू मध आणि हस्त निर्मित साबण यांची पाहणी केली, व प्रशिक्षणा दरम्यान प्राविण्य मिळविलेल्या महिलांना प्रमाणपत्राचे वाटपही आमदार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या संकल्पनेतून सदर विक्री केंद्रामध्ये महिलां व माता लहान बाळासाठी हिरकणी कक्षाची स्थापना मीनाक्षी सुनील भालेराव यांनी केली या ठिकाणी महिला बचत गटाचे फेडरेशन तयार करून व्यवस्थापक वर्षा आटवर्धन, व राम डोंगरे या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीआहे सदर विक्री दालनाचे संचालन नगरपरिषद चिखलदरा द्वारे करण्यात येत आहे.खादी ग्रामोउद्योग शिवस्फूर्ती क्लस्टर (सीएफसी) केंद्रामुळे १५० महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली असुन उत्पादित वस्तूंची विक्री करण्याची सोय ही झालीआहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013550
error: Content is protected !!