अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीतील नराधम २१ वर्षीय आरोपीने एका चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली आहे. सदर चिमुकलीवर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपीला सोनाळा पोलिसांनी अटक केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात नातेवाईक असलेल्या नराधम आरोपीने सदर चार वर्षीय चिमुकलीला काही कारण सांगून सोबत घेऊन गेला होता. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीला अटक केली. सोनाळा पोलिसांनी नातेवाइकासह अकोला गाठून पीडित चिमुकलीला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून घेतले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांनी तिच्यावर उपचार सुरू केले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलिस करीत आहेत.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com