कोरची : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ,(सारती) ,पुणे यांच्या संयुक्त विदमाने छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी योजना अंतर्गत तथा शिवजयंती निमित्त तहसील कार्यालय कोरची येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशांत गड्डम तहसीलदार कोरची ,प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र मा़डवगडे नायब तहसिदार कोरची श्रीमती ज्योती गो़ंधोडे नायब तहसिदार,राष्ट्पाल नखाते पत्रकार,बंडूभाऊ ढोरे तसेच विद्यार्थिनी म्हणून रूपाली ढोरे,मनिषा नखाते आदि मान्यवर उपस्थित होते.
मान्य वराच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दीप प्रजलून करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम दखणे सर यांनी सारती युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सरसेनावीर बाजी पासलकर सारथी योजनेसंदर्भामध्ये विद्यार्थ्यांना शिकता शिकता कमवा, या योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच ज्या विद्यार्थ्यांनी शिकता शिकता कमवा असा सारथी योजनेचा लाभ घेतला त्या विद्यार्थ्यांनी पालकांचा कपडे घेऊन व पुष्पगुच्छ देउन स्वागत केले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावीष्ठ व त्यांच्या कामगीरीबद्दल प्रशांत गड्म तहसीलदार साहेब यांनी मोलाच मार्गदर्शन केले. आर. व्ही. माडवगडे,बंढूभाऊ ढोरे,राष्ट्पाल नखाते (पत्रकार,)यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती मोलाचे मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजी महाराज सारथी व व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सरसेना वीर बाजी पासलकर सारथी या योजनेबद्दल दखने सर यांनी माहीती दिली. ही योजना आपल्या तालुक्यात पहिल्यांदाच आहे त्यामुळे यासारख्या अनेक योजना वरती प्रशासन कार्यक्रम राबवणार आहे .त्यामुळे विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसे आव्हान अध्यक्ष भाषणामध्ये तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी मोलाचा मार्गदर्शन केल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दखणे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एम.डी निकुरे, संचालन. आर.व्ही.धाईल मंडळ अधिकारी,या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी मसेली, एन व्ही कुंभरे मंडळ अधिकारी बेडगांव ,बी.यु.नंदागवडी, राम.विदेवर, एम.डी.निकुरे, पी.पी.वैघ तलाठी, प्राजली मेश्राम, युवराज लाडे, बी.टी भगत,आकाश अंबादे,व्ही .डी .सोरते, उज्वला उसेंडी ,रोहिणी कोटनाके, भाग्यश्री कोकोडे, आर.एम.बाकडा, शेवंता दुर्गा, डी .आर. मडावी , . हस्तकला सयाम ,कुमारी पोरेटी ,कु.श्रीमती के .आर .साळवे,व तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते ज्या विद्यार्थ्यांनी (सारथी) विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण घेतले अशा विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या कमाई ने आपल्या पाल्यांना कपडे देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच या सोहळ्यास तहसीलदार प्रशांत गड्डम साहेब तसेच ओमप्रकाश रहपाडे साहेब महसूल अधिकारी तसेच , बि .यू नंदागवळी साहेब महसूल सहायक्क मोलाचे सहकार्य लाभले

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com