नांदगाव रस्त्यावरील किनेबोडीजवळ रेतीची डंपिंग
झारितील शुक्राचार्यावर कारवाईची मागणी
देशोन्नती वृत्तसंकलन…
कोरपना (Sand smuggling) : राजुरा तालुक्यातील ‘मारडा’ नदीपात्रातून गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेती उपसा करून चढ्या दराने विक्री केली जात आहे? निंबाळा आणि मारडा,येथील २ ट्रॅक्टर मालकांची जणू येथे मक्तेदारीच आहे! ‘कोणी काही केलं तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही’ या (Sand smuggling) आविर्भावात असलेले हे दोघेही नेमके कोणाच्या जीवावर उड्या मारत असेल? हे कळायला मार्ग नाही.
यांच्या म्हणण्यानुसार यांचे संबंधीत सर्व विभागांत अगदी मैत्रिपूर्ण संबंध असल्यामुळे कदाचित यांच्यावर कारवाई होत नसावी? अशी शंका व्यक्त होत असून पोलीस व महसूल विभागातील झारितील शुक्रचार्य यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांतून होत असताना यांच्या सोबतीला आता कवठाळा येथील एका जुन्या (Sand smuggling) रेती माफियाचे नाव सुद्धा समोर आले आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारडा येथील ट्रॅक्टर मालक बेधडक मारडा नदीपात्रातून रेतीचा उपसा करून नांदगाव रस्त्यावरील किनेबोडीजवळ एका पठार जागेवर रेती डंपिंग करते. नंतर कवठाळा येथील,तो रेती माफिया आपल्या ट्रॅक्टरने ती रेती आणून कवठाळा व परिसरातील इतर गावखेड्यात गरजवंतांना मनमानी दराने विक्री करते.राजुरा व कोरपना तालुक्यातील संबंधीत विभागाच्या नाकावर टिच्चून सर्रासपणे हा प्रकार सुरू आहे.राजुरा तालुक्यातील (Sand smuggling) रेती कोरपना तालुक्यात आणली जात असल्याचे चित्र असून यांच्यावर आजपर्यंत कारवाई न झाल्याने,हे रेती माफिया गब्बर बनले आहेत. रेतीघाटांचे लिलाव झाले नाही.
शासनाची बंदी असतांनाही अवैधरीत्या रेतीचा उपसा करून खुलेआम वाहतूक होत असल्याचे सर्वसामान्य जनतेला दिसून येते. मात्र, या क्षेत्रातील पटवारी, मंडळाधिकारी, पोलिसांना का दिसत नाही? याविषय अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.दोन दिवसांपूर्वीच मारडा येथील ट्रॅक्टर,रेती आणताना आढळून आले. असे प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून अविरतपणे सुरू आहे. ही बाब संबंधीत विभागाच्या नजरेतून कशी काय सुटू शकते हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे. मोठ्या प्रमाणात (Sand smuggling) रेती उपसा करून पर्यावरणाची ऱ्हास करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज असून हे सौजन्य माञ कोण दाखवणार? याकडे लक्ष लागले आहे.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com