State Journalist Association: बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी आ. देवेंद्र भुयार यांच्या विरोधात पत्रकारांचा एल्गार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारासमोर दिले निदर्शने

अमरावती : माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड येथील दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी तुषार अकर्ते यांना मोबाईल वरून धमकी दिली तसेच सोशल माध्यमांवर अक्षपार्य पोस्ट केल्याने पत्रकारांच्या भावना दुखावल्या आहेत. विरोधात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने बुधवार (ता.१९) रोजी जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारासमोर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे  विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे यांच्या नेतृत्वात निदर्शने देऊन माजी आमदार यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी माजी आमदार देवेंद्र भुयार मुर्दाबाद मुर्दाबाद, पत्रकारांचा अपमान करणाऱ्या देवेंद्र भुयार यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विजय असो पत्रकार एकजुटीचा विजय असो हम सब एक है च्या घोषणांनी जिल्हा कचेरी परिसर दणाणून सोडले होते.

दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधि तुषार अकर्ते यांनी वृत्त प्रकाशित केल्याबद्दल त्यांना माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी भ्रमणध्वनीवर धमकी दिली. तर सोमवारी(ता.१७) रोजी फेसबुक वर “असल्या भाडखाऊ पत्रकारांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही,आता मी रिकामा आहे” अशी पोस्ट टाकून पत्रकारांच्या भावना दुखावल्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ  मुंबई अमरावती जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध तीव्र करण्यात आला. त्यांच्या या वक्तव्या चा जाहीर निषेध म्हणून जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारासह जाहीर निदर्शने देण्यात देण्यात आली. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले.

आंदोलनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, जिल्हा सचिव शुभम मेश्राम, अशोकभाई जोशी मनीष जगताप उज्वल भालेकर मनीष गुडघे पी एन देशमुख विनोद इंगळे राजेंद्र ठाकरे गजानन खोपे संजय तायडे, अर्चना रक्षे,विनोद इंगळे,नितिन मुळे,नकुल नाईक, विक्रांत ढोके, विनोद कुलदेवकर स्वराज वायकर वीरेंद्रसिंह ठाकूर दिनेश खेडकर जयकुमार बुटे प्रशांत सुने धनराज खर्चान अनिरुद्ध उगले सागर डोंगरे सुरेश कपूर ऋषभ सोनी वैभव गव्हाणे गजानन मेश्राम सागर तायडे सुनील दामले सचिन पाटील बबलू यादव वैष्णवी कळमकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ  अमरावती जिल्हा शाखेच्या पदाधिकारी, सदस्य पत्रकार बहुसंख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड येथील संघटनेचे पदाधिकारी अकर्ते यांना बातमी छापली म्हणून धमकी दिली तसेच सोशल मीडियावर पत्रकारांची बदनामी करणारे पोस्ट टाकली या विरोधात त्यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करणार.
– नयन मोंढे, विदर्भ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ

पत्रकार विरोधात गरड ओकणाऱ्या माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे यांच्या नेतृत्वात जिल्हा कचेरी समोर निदर्शने देण्यात आली. माजी आमदारांवर आठ दिवसात कारवाई न झाल्यास त्यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन करणार.
-विजय गायकवाड, जिल्हाध्यक्ष, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती

ज्या  पत्रकारांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून देवेंद्र भुयार यांना जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर आमदार पदापर्यंत पोहोचविले त्याच पत्रकारान विरोधात वक्तव्य करून पत्रकारांच्या भावनेशी खेळत आहेत कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– प्रवीण शेगोकार, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई

Facebook
Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Our Visitor

0 5 0 3 1 2
Users Today : 0
Users This Month : 324
Total Users : 50312
error: Content is protected !!