मानोरा : स्थानिक एल. एस. पी. एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , धामणी मानोरा येथे छत्रपती शिवरायांचा 395 वा जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही. बि.पाटील यांनी शिवरायाचे राज्यकारभार संदर्भात मत व्यक्त करताना केवळ छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले नाही तर, त्याच बरोबर सुराज्य देखील निर्माण केले आणि महाराष्ट्राची तत्कालीन विस्कटलेली घडी नीट केली, असे प्रतिपादन त्यांनी केले.
वक्त्यांनी शिवचरित्रावर मांडले प्रखर विचार…
सर्वप्रथम छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्षाचे हस्ते करण्यात आले. अतिथीचे स्वागतानंतर प्रस्तावित भाषण शिक्षक चिंतामण कळंबे यांनी केले, त्यामधून त्यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली व शिवरायांची युद्धनीती, विज्ञानवाद, अंधश्रद्धाविषयक विचार, शेतकरी आणि महिला संबंधीचे विचार त्यांनी विद्यार्थ्यांना सुलभरित्या समजावून सांगितला. त्यानंतर विद्यार्थी वक्त्यांनी शिवचरित्रावर प्रखर विचार मांडलेत त्यामध्ये कु.संचिता खडसे, कु.भक्ती गावंडे, चिन्मय पदमगिरवार, कु. समता खडसे, कु. आकांक्षा भगत, कु. अमृता ठाकरे, कु. भक्ती भोंगे, हर्ष काळे, कु. ईश्वरी हांडे, आदर्श खिराडे, पार्थ इंगोले, आराध्या ठाकरे, नम्रता ठाकरे, कु. चैताली भगत, श्रावणी तावडे, कु. समीक्षा मोहाळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
शिक्षक निलेश भेंडे यांनी ‘छत्रपतींच्या चारित्र्याचे गुणवैशिष्ट्ये’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर अध्यक्षाचे समायोचित मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह सर्वच शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन शिक्षक प्रविण ढबाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक घनश्याम दळवी यांनी केले.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com