बनावट दस्तावेज दाखवत बँकेला पाच लाखांचा चुना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

xr:d:DAFgIbLDK_Y:11,j:2757792986,t:23041501

 

अमरावती : दुसऱ्याच्या मालकीची स्थावर मालमत्ता खोट्या व बनावट दस्तऐवजाच्या आधारावर स्वतःची दाखवून पाच लाख रुपयांच्या कर्जाची उचल करीत येथील अकोला को-ऑप बँकेची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २ मे रोजी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी २ मे रोजी दुपारी बँकेचे अधिकारी उमेश काशीकर यांच्या तक्रारीवरून तीन आरोपींविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

गौतम सुनीलकुमार कोठारी, महावीर राजेश कोठारी (दोघेही रा. गणेश कॉलनी) व गोपाल रमेश राठोड (रा. कुंभारकिन्ही, दारव्हा, यवतमाळ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गौतमची राजकमल चौक परिसरात पूजा एंटरप्रायजेस नामक फर्म असून त्याने व्यवसायासाठी अकोला को- ऑपरेटिव्ह बँकेच्या येथील राजापेठ शाखेतून ५ लाख रुपयांच्या कर्जाची उचल केली होती. त्यावेळी महावीर कोठारी व गोपाल राठोड हे दोघे जामीनदार होते. या तिघांनी संगनमत व कट रचून कर्जासाठी दुसऱ्याच्या मालकीची स्थावर मालमत्ता स्वतःची दाखवून खोटे दस्तऐवज सादर केले.

सुरुवातीपासूनच फसवणुकीचा डाव आरोपींनी कर्जाची उचल करण्यासाठी उपनिबंधक कार्यालय, दारव्हा, यवतमाळ येथील खोटे शिक्के तयार करून खरे गहाणखत नोंदविल्याचेही दाखविले. दरम्यान, बँकेच्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे बँकेच्या राजापेठ येथील शाखेचे अधिकारी उमेश काशीकर (५९) यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.आरोपींचा सुरुवातीपासूनच बँकेला फसविण्याचा उद्देश असल्याने त्यांनी त्या मालमत्तेचे गहाणखत बँकेला करून दिले नाही, असेही काशी करयांनी तक्रारीत म्हटले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013579
error: Content is protected !!