कोरची: मा.गृहमंत्री भारत सरकार, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. मंत्री ग्रामविकास व पंचायतराज विभाग यांचे उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 मध्ये घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व 1क्लिक मध्ये प्रथम हप्ता वितरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून राजेश फाये गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरची, याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच 100 दिवसाच्या कार्यक्रमाचे अनुषंगाने घरकुल लाभार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले यावेळेस विस्तार अधिकारी सांख्यिकी राहुल कोपुलवार, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दिगंबर पेंटेवाड, राहुल मुलकलवार, पीयूष चिलांगे, ऑपरेटर किशोर मारगाये आणि मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थी उपस्थित होते. तालुक्यात एकूण 1624 घरकुले मंजूर झाली आहेत.
राजेश फाये गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी 90 दिवसात घरकुल बांधकाम करून जो लाभार्थी देईल त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल ज्या घरकुलधारकांना काही अडचणी भासल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. घरकुल लाभार्थ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना आपली मते व्यक्त केली की ,कोरची तालुक्यांमध्ये रेती घाट लिलाव नसल्यामुळे (Gharkul Beneficiary) घरकुलधारकांना रेती स्टा करून उपलब्ध दिल्यास चांगल्या दर्जाची रेती मिळेल ते स्वस्त दरात मिळेल आणि घरकुल बांधकाम लवकरात लवकर करण्यात येईल अशी लाभार्थ्यांची मागणी केली. संवर्ग विकास अधिकारी राजेश फाये यांनी वरिष्ठ लोकांसोबत चर्चा करून रेती उपलब्ध करून देऊ असे आश्वासने दिले. या कार्यशाळेमध्ये घरकुल लाभार्थी महिला पुरुष उपस्थित होते.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com